विविध क्षेत्रात कार्य केलेले भूमिपुत्र

विविध क्षेत्रात कार्य केलेले भूमिपुत्र

कोकणरत्न पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकणातील निवडक व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले. स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या ‘कोकणरत्न’ या मानाच्या पदवीसाठी यंदा उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कोकणरत्न रुपेश रवींद्र कदम , विरार (इसवली, खांबेरे ,लांजा रत्नागिरी )

रुपेश रवींद्र कदम , विरार (इसवली, खांबेरे ,लांजा रत्नागिरी )

विरारचे रुपेश कदम : उद्योजकांना प्रेरणा देणाऱ्या चळवळीचे निर्माते महाराष्ट्रातील उद्योजकांना दिशा, स्वप्नांना शब्द आणि संधींना व्यासपीठ देणारा एक प्रेरणास्रोत म्हणून विरारमधील तरुण उद्योजक रुपेश कदम नावारुपाला आले आहेत. जास्तीत जास्त मराठी तरुणांनी व्यवसायाकडे वळावे यासाठी त्यांनी नीरनिराळ्या मार्गाने व्यासपीठ उभी केली आहेत. २०१९ साली एका स्पष्ट ध्येयाने रुपेश कदम यांनी जीवदानी इन्फोटेक या सॉफ्टवेअर संस्थेची सुरुवात केली. पुढे व्यवसायाची व्याप्ती वाढवून सॉफ्टवेअर, कॉम्पुटर सेल्स अँड सर्विसेस, आर्थिक गुंतवणूक आणि लीगल डॉक्युमेंट आणि दुकान परवाने या नव्या व्यावसायात चांगल्याप्रकारे आपले स्थान निर्माण केले. आपल्या व्यवसायात स्थिरावल्यानंतर मराठी माणसाला व्यवसायात अधिकाधिक संधी मिळाव्यात यासाठी त्यांनी २०२४ पासून उद्योग चळवळीत सक्रिय माहिती स्वतःच्या सहभाग घेतला. आणि नव्या तंत्रज्ञानाची भाषेत, विश्वासाने मिळावी यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली. महाराष्ट्रातील एकजूट नसलेल्या लहान मोठ्या व्यावसायिकांना एकत्र आणण्याचे आणि त्यांना व्यवसाय मिळवून देण्याचे काम ते निरनिराळ्या व्यावसायिक संघटनेतून करत आहेत. मराठी व्यावसायिकांची एकमेकाला ओळख व्हावी, त्यातून व्यवसाय वाढावा यासाठी ते सातत्याने मेळावे आणि त्यातून हमखास व्यवसाय

मराठी व्यावसायिकांची एकमेकाला ओळख व्हावी, त्यातून व्यवसाय वाढावा यासाठी ते सातत्याने मेळावे आणि त्यातून हमखास व्यवसाय
मिळवून देण्याचे कार्य ते विनामुल्य करीत असतात. “मी उद्योजक होणारच” या संघटनेच्या निमंत्रणावरून मुंबई स्टॉक एक्सेंज मध्ये त्यांनी सहभाग घेवून मराठी तरुणांना उद्योगधंद्याकडे वळण्याची साद घातली.
तरुण वयातच रुपेश कदम हे जीवदानी इन्फोटेक, आर के कॉम्पुटर, जीवदानी मल्टि सर्विसेस आणि मनोहर फायनान्स सर्विसेस या कंपन्यांचे संचालक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडीत आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांच्या अर्धांगिनी आणि जीवदानी मल्टि सर्विसेस च्या सह संचालिका दिपाली कदम या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. रुपेश यांच्या एकंदर कार्याची दखल घेवून महाराष्ट्र उद्योजक आणि कोकणरत्न मानद पदवीने त्यांचा गौरव ही करण्यात आला आहे. ते मराठी एकीकरण समितीचे शिलेदार आणि स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचे सोशल मीडिया समन्वयक आहेत.

कोकणरत्न श्री विनोद गणपत कोळी , मोहा कोळीवाडा उलवे, पनवेल, रायगड.

संस्थापक : आगरी कोळी उद्योग समूह आगरी कोळी बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था

आगरी कोळी उद्योग समूहमार्फत अनेक उद्योजक निर्मिती .
काही उद्योजकांना आर्थिक सहकार्य
करून त्यांच्याकडून एके प्रॉडक्टची निर्मिती.
गावोगावी जाऊन महिला बचत गट महिला मंडळ व ग्रामस्थांना भेटून
सामाजिक एकी आणि एकमेकांना सहकार्य करून समाज एकत्र आणि समृद्ध करण्यासाठी प्रयत्न.
लॉकडाऊन मध्ये अनेकांना
आर्थिक मदत उपचारासाठी मदत घरगुती रेशन ची मदत शिक्षणासाठी मदत काहींना रोजगार मिळावा म्हणून एके प्रॉडक्टदेऊन प्रॉडक्ट विक्रीनंतर पैसे परत करण्याच्या बोलीवर मदत .

कोकणरत्न विजय कुरधुंडकर लिंगायत

कुरधुंडा, तालुका : संगमेश्वर .

कुरधुंडा तालुका संगमेश्वर येथील शेतकरी कुटुंबात वाढलेले आणि सध्या कल्याण येथे वास्तव्यास असणारे लेखक,कवी, पत्रकार श्री विजयकुमार कृष्णा लिंगायत यांचा 13,डिसेंबर 2025 रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन- मुंबई येथे ‘स्वतंत्र कोकण अभियानाचे अध्यक्ष माननीय संजय कोकरे यांच्या हस्ते “कोकणरत्न “पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. मुंबई सह- पालघर, ठाणे, रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून हजारोंच्या संख्येने स्वतंत्र कोकण अभियानाचे शिलेदार,पत्रकार, हितचिंतक, विचारवंत या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार सचिन कळझूणकर,प्रमुख पाहुणे अध्यक्ष धनंजय कुवेस्कर-मुंबई अध्यक्ष तसेच राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे,दिलीप लाड यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.आठले सप्रे कॉलेज देवरुख मधून राष्ट्रीय प्रौढ साक्षरता कार्यक्रमाने समाज सेवेची सुरुवात झाली. त्या नंतर प्राइड इंडिया महाड,कास्प-प्लॅन- मुंबई, राजेंद्र हनी कोंब -मुरबाड,अनारडे फाउंडेशन- कर्जत, ऑडियन्स रिसर्च युनिट- आकाशवाणी मुंबई तसेच वीरशैव लिंगायत मंडळ ठाणे ते बदलापूर,वीरशैव लिंगायत हितवर्धक मंडळ शिवडी, कोकण वीरशैव लिंगायत मंडळ बोरिवली,वीरशैव लिंगायत क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड गिरगाव मुंबई,महाराष्ट्र वीर शैव सभा पुणे, गुणवंत कामगार संघ सेंचुरी रेयॉन – कल्याण,काव्य किरण मंडळ कल्याण,अशा विविध ठिकाणी सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य आणि समाज विकास कार्यक्रमात आपला सक्रिय सहभाग .

कोकणरत्न सायली सलील मांजरेकर, मालवण.

समाजसेविका म्हणून जेवढं जमेल तसं काम करते. स्त्री वर होणाऱ्या अत्याचार यावर महिलांना खूप सपोर्ट केलाय.
2025 मध्ये कोकण सुंदरी आणि आता 2026 मध्ये कोकण रत्न असे पुरस्कार मिळालेत . त्याआधी मला बरेच पुरस्काराने सन्मानित केले आहे ,चॅनल वर मुलाखती ही घेतल्या गेल्यात.

कोकणरत्न अब्दुलकदीर इब्राहिम चिलवण

Teacher

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

कोकणरत्न ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर

नमस्कार मी ऐश्वर्य जनार्दन  मांजरेकर  लॉ कॉलेज कुडाळ चा विद्यार्थी तसेच विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत विधी स्वयंसेवक  सिंधुदूर्ग म्हणून कार्य करतो , तसेच महाराष्ट्र लॉ विधी असोसिएशन कुडाळ मालवण कॉलेज अध्यक्ष ,

आतापर्यंत केलेले सामजिक  व शैक्षणिक  कार्यातील थोडेसे योगदान :-

कोकणरत्न अनिल तावडे

समाजसेवक,लेखक श्री. अनिल तावडे यांना “कोकणरत्न पदवी” गौरव सन्मान प्रदान

          देवगड तालुक्यातील शिरगावचे सुपुत्र मुंबईस्थित श्री.अनिल वासुदेव तावडे यांना “स्वतंत्र कोकणराज्य अभियान”तर्फे कोकणरत्न पदवी गौरव सन्मानपूर्वक प्रदान करण्यातआला.

        शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी मुंबई मराठी पत्रकार भवन,मुंबई येथे संस्थापक/अध्यक्ष श्री.संजय कोकरे आणि प्रमुख पाहुणे पत्रकार श्री.सचिन कळझुनकर यांच्या शुभहस्ते “कोकणरत्न मानद पदवी सन्मानपत्र” देऊन कोकणातील कार्याची दखल घेऊन निवडक कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला.

      त्यांनी सातत्याने केलेल्या सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्षेत्रात केलेल्या अष्टपैलू कामगिरीची दखल घेण्यात आली.

           कामगार विभागात विविध उपक्रम राबवून कोकणातील उन्नतीसाठी झटणाऱ्या श्री.अनिल वासुदेव तावडे यांनी कोकण विभागातही आपले योगदान दिलेले आहे.त्यांचे मालवणी मातीशी असलेले नाते लेखन, दिग्दर्शन आणि समाजसेवेतून कायम परावर्तित होत असते.

             समाजात प्रचंड जनसंपर्क असल्याने विविध मान्यवर सामाजिक संस्थांकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

कोकणरत्न रुपेश कोलते

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

कोकणरत्न श्री बापू शांताराम परब

सामाजिक कार्य व त्यातील सहभाग