आमच्या विषयी
- Home
- About Us
आमच्याविषयी
स्वतंत्र कोकणराज्य अभियानच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
स्वतंत्र कोकणराज्य अभियान म्हणजे कोकण प्रदेशासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करणारी एक सामाजिक, राजकीय चळवळ आहे या अभियान मागील मुख्य संकल्पना, उद्दिष्टे व पाश्र्वभूमी थोडक्यात मांडत आहोत
ध्येय व उद्दिष्टे
ध्येय (Vision)
कोकण विभागाचा स्वतंत्र राज्य म्हणून सर्वांगीण, संतुलित व शाश्वत विकास साधणे,
कोकणातील जनतेला स्वतःची ओळख, हक्क, स्वाभिमान व न्याय मिळवून देणे आणि
कोकणाची सांस्कृतिक, नैसर्गिक व ऐतिहासिक अस्मिता जपणे हे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे प्रमुख ध्येय आहे.
उद्दिष्टे (Objectives)
स्वतंत्र कोकणराज्याची मागणी
कोकणातील भौगोलिक, आर्थिक, सामाजिक व प्रशासकीय परिस्थिती लक्षात घेऊन स्वतंत्र राज्य निर्मितीसाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे.
कोकणातील जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष शेतकरी, मच्छीमार, आदिवासी, कामगार, युवक व महिलांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व संवर्धन करणे.
स्थानिक रोजगार व उद्योगांना प्रोत्साहन कोकणातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक उद्योग, पर्यटन व पारंपरिक व्यवसायांना चालना देणे.
नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण
कोकणातील जंगल, समुद्रकिनारे, नद्या, डोंगर, शेती व पर्यावरणाचे रक्षण करणे आणि शाश्वत विकासाचा मार्ग अवलंबणे.
कोकण भूमीवर अंदाधुंद विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास करणारे काही उद्योजक आहेत त्यांच्या कर्माची किंमत इथल्या लोकांना चुकवावी लागते आहे. प्रशासनातील अन्यायाविरुद्ध आवाज कोकणावर होत असलेल्या दुर्लक्ष, अन्यायकारक प्रकल्प, विस्थापन व शोषणाविरोधात संघटित जनआंदोलन उभारणे.
कोकणची भाषा, संस्कृती व परंपरा जतन कोकणी संस्कृती, लोककला, परंपरा, सण-उत्सव व भाषिक अस्मिता जपण्यासाठी विशेष उपक्रम राबवणे.
कोकणातील जनतेच्या आशा, आकांशा, स्वप्ने, निराशा या सगळ्यांचा सामूहिक उद्गार म्हणजे स्वतंत्र कोकणराज्य. कोकणची वैचारिक परंपरा सहिष्णतेची, उदारतेची असली तरी आज कोकणचे सर्वच क्षेत्रात अध:पतन झाले आहे म्हणून जनजागृती व लोकसहभाग गावागावात, शहराशहरात जनजागृती करून सामान्य जनतेला चळवळीत सहभागी करून घेणे.
लोकशाही व शांततामय मार्ग
कायदेशीर, संविधानिक व अहिंसक मार्गाने स्वतंत्र कोकणराज्याच्या मागणीसाठी सातत्यपूर्ण संघर्ष करणे.
प्रस्थापित राजकीय पक्षांनीच कोकण भुमीचा लिलाव सुरु केला आहे या पक्षांना चाप बसविण्यासाठी भुमीपुत्रांन कडुन स्वतंत्र कोकण राज्याची मागणी होते आहे.
स्वतंत्र कोकणराज्य अभियान हे केवळ राजकीय आंदोलन नसून, ते कोकणभुमी अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि भविष्याचा लढा आहे असे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे साहेब यांचे ठाम मत आहे.