जनजागृती अभियान
कोकण राज्य अभियान ही भूमिपुत्रांची चळवळ व्यवस्था बदलण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जर आमची भूमी असूनही, आम्हाला आमच्या कोकणी माणसाला समोर ठेवून धोरणे राबवता येणार नसतील तर या व्यवस्थेचे करायचे काय?
व्यवस्था बदलल्याशिवाय आपले हक्क अधिकार अबाधित राहणार नाहीत…
व्यवस्था बदलायची असेल तर प्रथम विचारांमध्ये परिवर्तन करावे लागेल. गेल्या शंभर वर्षांमध्ये डोक्यात भरवलेले विचार, प्रथम बदलावेच लागतील. तर आणि तरच कोकणातील कोकणी लोकांचे हक्क अधिकार अबाधित राहतील. अन्यथा कोकण भूमीत कोकणी माणूस भाडेकरू होईल व गुलाम बनून कामे करेल.
संजय कोकरे संस्थापक स्वतंत्र कोकणराज्य अभियान
सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे विरोध नव्हे, तर जबाबदारीचं नागरिकत्व आहे!
“प्रश्न विचारणं म्हणजे विरोध नव्हे – जबाबदारीचं नागरिकत्व आहे!”
लोकहो आपण कुणाला घाबरत आहात? कोकणच्या विकासासाठी प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नाही… हीच तर खरी लोकशाही आहे!
आज जर तुम्ही सरकारला प्रश्न केला… की,
“रस्ता अजून पूर्ण का झाला नाही?”
“महामार्गाच्या निधीचं काय?”
“काम करत नसलेल्या ठेकेदारांवर कारवाई अद्याप का नाही?”
…तर लगेच एक लेबल मिळतं – “विरोधक आहात का?”
विरोधक नव्हे – आपण जागरूक नागरिक आहोत!
आमचं गाव आहे,
आमचे रस्ते आहेत,
आमचा जीव जातोय,
मग प्रश्न विचारायचा हक्कही आमचाच आहे!
“लोकशाहीत मतदानानंतर दुसरं मोठं कर्तव्य असेल, तर ते म्हणजे – सरकारला प्रश्न विचारणं!”
(जाब विचारणे)
मग प्रश्न विचारणाऱ्याला ‘राजकीय’ व्यक्ती आहे असे म्हणणं ही यंत्रणेची पळवाट आहे!
आवाज उठवणाऱ्याला विरोधक ठरवणं…
प्रश्न विचारणाऱ्याला आंदोलनकरी ठरवणं…
हक्क मागणाऱ्याला गुन्हेगार ठरवणं
ही सगळी लोकशाही पचवू न शकणाऱ्यांची यंत्रणा आहे!
कोकणवासीयांनी आता ‘गप्प राहणं’ सोडून ‘जवाब मागणं’ सुरू केलं पाहिजे!
प्रत्येक अपूर्ण रस्त्याला प्रश्न
प्रत्येक रखडलेल्या टप्प्याला प्रश्न
प्रत्येक आमदार, खासदार, मंत्र्याला थेट प्रश्न!
आजचा निर्धार:
“मी विरोधक नाही – मी जबाबदार कोकणकर आहे!
माझा प्रश्न म्हणजे माझं हक्काचं
स्वतंत्र कोकण राज्य
🍀“जमीन विकतो आहे…”‼️
सध्या कोकणात हा एक शांत, पण धोकादायक आवाज फिरतोय.
तो आवाज कुणी ओरडत नाही, पण प्रत्येक गावात, प्रत्येक घराच्या काठाने फिरतो — “जमीन विकतो आहे…”‼️
ही वाक्यं ऐकताना मनात पोकळी उरते.
कारण आपण जिथे उभे आहोत, तिथे जमीन फक्त चौरस फुटात मोजली जात नाही — ती भविष्यात मोजली जाते.
आणि हे सत्य जितकं कटू, तितकंच अत्यावश्यक आहे —
कोकणी माणूस फक्त जमीन विकतोय नाही… तो आपल्या पिढ्यांचं भविष्य विकतोय.
आणि जग?
ते हसत-हसत ते भविष्य खरेदी करतंय.
कोकण , आपण भविष्य विकतोय, आणि जग ते खरेदी करतं…
शहरात आपण SIP, Mutual Funds, RD-FD, LIC घेतो — कारण त्यात future security असते.
आपण विचार करतो — “दीर्घकालीन गुंतवणूक हवी.”
पण कोकणात?
जिथे पृथ्वीचं सर्वात मोठं लाँग-टर्म अस्टेट आपल्या पायाखाली पसरलेलं आहे, त्याचं future आपण एका सहीत संपवतो.
जमीन एकदाच विकली जाते.
त्या जमिनीतून मिळकत मात्र पिढ्यानपिढ्या चालते.
हे साधं गणित आहे — पण आपणच त्याचं उत्तर चुकतोय.
आज कोकणात समुद्रकिनाऱ्यांची गावं कोणाच्या मालकीची आहेत⁉️
तुम्हाला उत्तर माहीत आहे.
आधी ती तुमची होती.
आता⁉️
नकाशावर नाव तुमचं, जमीन त्यांच्या मालकीची.
आणखी दहा वर्षं वाट पाहा —
तुमच्या घराजवळच्या माळरानावर रिसॉर्ट उभा असेल,
तुमच्या वडिलांनी राखलेली आंब्याची बाग लॉनमध्ये बदललेली असेल,
आणि तुमच्या कुटुंबाच्या इतिहासावर उभं राहिलेलं शेत आता कुणा बाहेरच्या कंपनीचं “फार्म-टूरिझम” असेल.
आणि तुम्ही⁉️
तुम्हाला ते पाहायला पार्किंग टिकीट घ्यावं लागेल.
ही वेळ क्रूर आहे —
कारण सत्य थेट डोळ्यांत बघतंय.
जमीन विकणारा कोकणी म्हणतो,
“काय करू⁉️काम नाही. त्रास आहे. खर्च आहे.”
पण जमीन घेणारा बाहेरचा म्हणतो,
“ही सोन्याची खाण आहे.”
एकाच जमिनीबद्दल दोन विरुद्ध विचार —
फरक फक्त दृष्टीचा.
ज्यांनी जमीन विकत घेतली ते उद्या हॉटेल्स, होमस्टे, फार्मस्टे, सुगंध प्रकल्प, खाद्य-प्रक्रिया उद्योग, नर्सरी, प्लॉटिंग — काहीतरी निर्माण करणार.
ज्यांनी जमीन विकली ते?
ते उद्या त्याच प्रकल्पात काम मागणार.
इतिहास साक्ष देतो —
गोवा, दमन, बेंगळुरू, समुद्रकिनारे,मुंबई , पुणे, हिमालयातील काही भाग —
जमीन गेली की स्थानिकांची सत्ता संपते.
संस्कृती बाजूला होते.
आणि लोक “ओळख” गमावतात.
कोकणही त्या तोंडावर उभं आहे.
आणि प्रश्न असा —
आपणही हा इतिहास पुन्हा लिहिणार का⁉️
जमीन विकण्याची कारणं आपण देतो —
कर्ज, लग्न, शहरात घर, शिक्षण…
पण ही फक्त वरची कारणं आहेत.
खरं कारण आहे — जमिनीचं मूल्य समजलं नाही.
जमीन ओझं नाही,
ती Premium Asset आहे —
जी भविष्यात जगाचं Future Currency बनेल.
कारण येणाऱ्या दशकात मूल्य कोणाचं वाढणार⁉️
सोने⁉️शेअर्स⁉️ इमारती⁉️
नाही.
पाणी, अन्न, निसर्ग, जैवविविधता — आणि जमीन.
ही चारही गोष्टी कोकणाकडे आहेत.
हा प्रदेश जगाच्या भविष्यातील सर्वात उंच बाजारात उभा राहू शकतो.
पण आपण⁉️ कपाळकरंटे…
आपण त्या भविष्याला विक्रीची पावती लिहितोय.
तुम्ही विचार केला आहे का⁉️
जमीन विकली नाही तर⁉️
त्या जमिनीत तुम्ही मसाले, औषधी वनस्पती, हर्बल उत्पादने, फळांचे प्रीमियम ब्रँड, इको-टूरिझम, वनस्पती-आधारित ग्लोबल उत्पादने, नर्सरी, सुगंध उद्योग — काहीही करू शकता.
ब्रँड तयार करू शकता.
Business-to-World करू शकता.
Passive Income तयार करू शकता.
मुलांच्या भविष्यासाठी पैसे नकोत — आधार हवा.
जमीन ती आधार आहे.
एक सही म्हणजे शेवट नव्हे —
एक सही म्हणजे आपल्या पिढ्यांची कहाणी संपवणं आहे.
आणि म्हणूनच हा लेख आहे —
तुम्हाला थांबवण्यासाठी नाही,
तर जागं करण्यासाठी.
🛑 कारण जमिनीचा मालक बदलला की इतिहास बदलतो.
आणि इतिहास बदलला की पिढ्या बदलतात.
शेवटी एक वाक्य — शेअर केल्याशिवाय राहणार नाही असं:
“आपण जमीन विकतोय…
आणि जग कोकणात भविष्य विकत घेतंय.”
या एकाच विचारानं जर एक कोकणी कुटुंब थांबलं,
एक जमीन वाचली,
एक भविष्य सुरक्षित झालं —
तर कोकणाचं उद्याचं चित्र आजच उजळू शकतं.
▪️साभार मेडिया
♦️सौजन्य: डॉ. संजीव लिंगवत, जनसेवा प्रतीष्ठान, सिंधुदुर्ग