आंदोलन

जनतेच्या हक्कासाठी आंदोलन

🔹 लोकशाही व शांततामय मार्ग

कायदेशीर, संविधानिक व अहिंसक मार्गाने स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणीसाठी सातत्यपूर्ण संघर्ष करणे.

✨ प्रस्थापित राजकीय पक्षांनीच कोकण भुमीचा लिलाव सुरु केला आहे या पक्षांना चाप बसविण्यासाठी भुमीपुत्रांन कडुन स्वतंत्र कोकण राज्याची मागणी होते आहे.

स्वतंत्र कोकण राज्य अभियान हे केवळ राजकीय आंदोलन नसून, ते कोकणभुमी अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि भविष्याचा लढा आहे असे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे साहेब यांचे ठाम मत आहे.

लक्ष्मी' ऑरगॅनिक

पीएफएएस रसायनांचे उत्पादन बंद करावे ,

‘लक्ष्मी’ ऑरगॅनिक’ विरोधात धरणे आंदोलन

खेड :- तालुक्यातील लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमधून पीएफएएस रसायनांचे उत्पादन तत्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी कोकण नागरी संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी कंपनीच्या मुख्य गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व कोकण नागरी संघर्ष समितीचे अशोक जाधव आणि राजू आंब्रे यांनी केले. पीएफएएस रसायने पर्यावरणासाठी तसेच मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून त्याचा थेट परिणाम पाणी, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या रसायनांचे उत्पादन तत्काळ थांबवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अशोक जाधव यांनी सांगितले की, पीएफएएससारखी घातक रसायने दीर्घकाळ पर्यावरणात टिकून राहतात. त्यामुळे भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ ठोस निर्णय घ्यावा. तर राजू आंब्रे यांनीही सर्व नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.