प्रत्रकार परिषद

स्वतंत्र कोकण राज्यभियान प्रत्रकार परिषद

पत्रकार परिषद

1) सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यावर अधारीत धर्म निरपेक्ष, एकात्मता लोकशाहीप्रधान व समाजवादी कोकण राज्याची ऊभारणी करने या साठी भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या ध्येय व ऊदिष्टांशी स्वतंत्र कोकणराज्य अभियान बांधील राहिल.

2) उपेक्षित व शोषितांच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनासाठी स्वीकारण्यात आलेल्या कार्यक्रमाची कसोशिने व कार्यक्षमपणे अंमलबजावणी करण्यात स्वतंत्र कोकणराज्य अभियान बांधील राहिल

3) स्वतंत्र कोकणराज्य अभियान अंतर्गत सामाजिक क्रांतीचा तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करुन ऊध्वस्त होत चाललेल्या कोकण प्रांताला वाचविण्यासाठी कोकण जनतेचा मनातील न्यूनगंड संपवायचा आहे.

4) स्वतंत्र कोकण राज्य निर्माण करण्यासाठी डोळे असुन आंधळे, कान असुन बहिरे आणि तोंड असुन मुके अश्या कोकणातील बांधवाना स्वतंत्र कोकणराज्य अभियाना अंतर्गत जिंवत, डोळस व बोलके करावयाचे आहेत.

5) स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे कार्यक्षेत्र फक्त कोकण प्रांत पुरते मर्यादित राहील.

6) मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणराज्याचा नकाशा बनवुन कोकण राज्याची मागणी केंद्र सरकार आणि राष्ट्रपतीना स्वतंत्र कोकणराज्य अभियाना तर्फे सादर करण्यात येईल.

7) भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला कोकणराज्य निर्माण करने हा मुख्य उद्देश स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचा आहे. कोकणातील जनतेच्या आशा, आकांक्षा, स्वप्ने, निराशा या सगळ्यांचा सामूहिक उदार म्हणजे स्वतंत्र कोकणराज्य.

संस्थापक अध्यक्ष

श्री. संजय धाकु कोकरे

पत्रकार उत्कर्ष समिती

 मुंबई विभाग यांची नुकतीच मुंबई येथे बैठक संपन्न झाली.यावेळी स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे अध्यक्ष आणि संस्थापक संजय कोकरे साहेब उपस्थित होते.