श्री. संजय कोकरे यांना मानव अधिकार अधिनियमचा सेवा गौरव पुरस्कार
स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. संजय कोकरे यांना त्यांच्या समाजहितार्थ केलेल्या उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत HUMAN RIGHTS सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वैशिष्ट्य असे की, सदर समितीला खडज मानांकन प्राप्त असून हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा सन्मान समजला जातो.
श्री. संजय कोकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र कोकण राज्य अभियान या उपक्रमाद्वारे सामाजिक न्याय, जनकल्याण, नागरिक हक्क संरक्षण, जनजागृती तसेच लोकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत उल्लेखनीय कार्य केले आहे. कोकणातील विविध सामाजिक, शैक्षणिक व विकासकामांसाठी त्यांनी दाखवलेला ध्यास आणि समाजहितासाठी केलेले कार्य यामुळे त्यांना हा मानाचा सन्मान प्राप्त होत आहे.
सोन्याचे कॉईन भेट
ऊद्योजक कोकणरत्न नितीन कोलगे आणि कोकण रत्न डॉ लिलाधर पाटकर यांच्याकडून संजय कोकरे संस्थापक स्वतंत्र कोकणराज्य अभियान यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान कार्यक्रमात सोन्याचे कॉईन सप्रेम भेट दिले आहे .