स्वतंत्र कोकणराज्य अभियान - कोकण सर्वोतोपरी
स्वतंत्र कोकण राज्य अभियान म्हणजे कोकण प्रदेशासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करणारी एक सामाजिक, राजकीय चळवळ आहे या अभियान मागील मुख्य संकल्पना, उद्दिष्टे व पाश्र्वभूमी थोडक्यात मांडत आहोत.
स्वतंत्र कोकण राज्य अभियान हे केवळ राजकीय आंदोलन नसून, ते कोकणभुमी अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि भविष्याचा लढा आहे असे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे साहेब यांचे ठाम मत आहे.
स्वतंत्र आणी पुर्णपणे संविधानिक सार्वभौम व स्वायत्त अधिकार असलेले कोकण राज्य अस्तित्वात यावे आणी अखिल कोकण प्रांत नव्या ओळखीने तसेच आर्थिक व सामाजिक समृद्धीने संपन्न व्हावा या एवमेव उद्देशाने प्रेरित
स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे ध्येय आहे.
कोकणी माणूस सदैव सर्वांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढला पण त्याबदल्यात त्याच्या हाती फक्त निराशा पडली.कोकणचा आर्थिक सामाजिक राजनैतिक विकास राहिला दुरच पण कोकणभुमी आणी निसर्ग संसाधने पुर्णपणे उध्वस्त करुन कोकणी माणसाला त्याच्याच भुमीत परागंदा करत देशोधडीला लावणारी धोरणे वारंवार राबविण्यात येतात.कोकणभुमीच्या महसुलावर अन्य प्रदेश पोसले जातात.कोकणी माणसाचे , कोकण भुमीचे अस्तित्व आणी वर्चस्व देशात तसेच जगात टिकण्यासाठी स्वतंत्र आणी स्वायत्त कोकण राज्य अस्तित्वात येणे ही काळाची गरज आहे.
कोकण राज्य अभियान ही भूमिपुत्रांची चळवळ व्यवस्था बदलण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जर आमची भूमी असूनही, आम्हाला आमच्या कोकणी माणसाला समोर ठेवून धोरणे राबवता येणार नसतील तर या व्यवस्थेचे करायचे काय?
व्यवस्था बदलल्याशिवाय आपले हक्क अधिकार अबाधित राहणार नाहीत…
व्यवस्था बदलायची असेल तर प्रथम विचारांमध्ये परिवर्तन करावे लागेल. गेल्या शंभर वर्षांमध्ये डोक्यात भरवलेले विचार, प्रथम बदलावेच लागतील. तर आणि तरच कोकणातील कोकणी लोकांचे हक्क अधिकार अबाधित राहतील. अन्यथा कोकण भूमीत कोकणी माणूस भाडेकरू होईल व गुलाम बनून कामे करेल.
संजय कोकरे संस्थापक स्वतंत्र कोकणराज्य अभियान