विविध क्षेत्रात कार्य केलेले भूमिपुत्र
कोकणरत्न पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकणातील निवडक व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले. स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या ‘कोकणरत्न’ या मानाच्या पदवीसाठी यंदा उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कोकणरत्न रुपेश रवींद्र कदम , विरार (इसवली, खांबेरे ,लांजा रत्नागिरी )
रुपेश रवींद्र कदम , विरार (इसवली, खांबेरे ,लांजा रत्नागिरी )
मराठी व्यावसायिकांची एकमेकाला ओळख व्हावी, त्यातून व्यवसाय वाढावा यासाठी ते सातत्याने मेळावे आणि त्यातून हमखास व्यवसाय
मिळवून देण्याचे कार्य ते विनामुल्य करीत असतात. “मी उद्योजक होणारच” या संघटनेच्या निमंत्रणावरून मुंबई स्टॉक एक्सेंज मध्ये त्यांनी सहभाग घेवून मराठी तरुणांना उद्योगधंद्याकडे वळण्याची साद घातली.
तरुण वयातच रुपेश कदम हे जीवदानी इन्फोटेक, आर के कॉम्पुटर, जीवदानी मल्टि सर्विसेस आणि मनोहर फायनान्स सर्विसेस या कंपन्यांचे संचालक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडीत आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांच्या अर्धांगिनी आणि जीवदानी मल्टि सर्विसेस च्या सह संचालिका दिपाली कदम या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. रुपेश यांच्या एकंदर कार्याची दखल घेवून महाराष्ट्र उद्योजक आणि कोकणरत्न मानद पदवीने त्यांचा गौरव ही करण्यात आला आहे. ते मराठी एकीकरण समितीचे शिलेदार आणि स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचे सोशल मीडिया समन्वयक आहेत.
कोकणरत्न श्री विनोद गणपत कोळी , मोहा कोळीवाडा उलवे, पनवेल, रायगड.
संस्थापक : आगरी कोळी उद्योग समूह आगरी कोळी बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था
- संस्थापक : आगरी कोळी उद्योग समूह
- संस्थापक : आगरी कोळी बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था
- कवी आणि समाजसेवक
आगरी कोळी उद्योग समूहमार्फत अनेक उद्योजक निर्मिती .
काही उद्योजकांना आर्थिक सहकार्य
करून त्यांच्याकडून एके प्रॉडक्टची निर्मिती.
गावोगावी जाऊन महिला बचत गट महिला मंडळ व ग्रामस्थांना भेटून
सामाजिक एकी आणि एकमेकांना सहकार्य करून समाज एकत्र आणि समृद्ध करण्यासाठी प्रयत्न.
लॉकडाऊन मध्ये अनेकांना
आर्थिक मदत उपचारासाठी मदत घरगुती रेशन ची मदत शिक्षणासाठी मदत काहींना रोजगार मिळावा म्हणून एके प्रॉडक्टदेऊन प्रॉडक्ट विक्रीनंतर पैसे परत करण्याच्या बोलीवर मदत .
कोकणरत्न विजय कुरधुंडकर लिंगायत
कुरधुंडा, तालुका : संगमेश्वर .
- लेखक
- कवी
- पत्रकार
कुरधुंडा तालुका संगमेश्वर येथील शेतकरी कुटुंबात वाढलेले आणि सध्या कल्याण येथे वास्तव्यास असणारे लेखक,कवी, पत्रकार श्री विजयकुमार कृष्णा लिंगायत यांचा 13,डिसेंबर 2025 रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन- मुंबई येथे ‘स्वतंत्र कोकण अभियानाचे अध्यक्ष माननीय संजय कोकरे यांच्या हस्ते “कोकणरत्न “पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. मुंबई सह- पालघर, ठाणे, रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून हजारोंच्या संख्येने स्वतंत्र कोकण अभियानाचे शिलेदार,पत्रकार, हितचिंतक, विचारवंत या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार सचिन कळझूणकर,प्रमुख पाहुणे अध्यक्ष धनंजय कुवेस्कर-मुंबई अध्यक्ष तसेच राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे,दिलीप लाड यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.आठले सप्रे कॉलेज देवरुख मधून राष्ट्रीय प्रौढ साक्षरता कार्यक्रमाने समाज सेवेची सुरुवात झाली. त्या नंतर प्राइड इंडिया महाड,कास्प-प्लॅन- मुंबई, राजेंद्र हनी कोंब -मुरबाड,अनारडे फाउंडेशन- कर्जत, ऑडियन्स रिसर्च युनिट- आकाशवाणी मुंबई तसेच वीरशैव लिंगायत मंडळ ठाणे ते बदलापूर,वीरशैव लिंगायत हितवर्धक मंडळ शिवडी, कोकण वीरशैव लिंगायत मंडळ बोरिवली,वीरशैव लिंगायत क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड गिरगाव मुंबई,महाराष्ट्र वीर शैव सभा पुणे, गुणवंत कामगार संघ सेंचुरी रेयॉन – कल्याण,काव्य किरण मंडळ कल्याण,अशा विविध ठिकाणी सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य आणि समाज विकास कार्यक्रमात आपला सक्रिय सहभाग .
कोकणरत्न सायली सलील मांजरेकर, मालवण.
- ब्युटीशीयन आणि मेकअप आर्टिस्ट
- ब्युटीशीयन आणि मेकअप ऐकेडमी
- समाजसेविका
समाजसेविका म्हणून जेवढं जमेल तसं काम करते. स्त्री वर होणाऱ्या अत्याचार यावर महिलांना खूप सपोर्ट केलाय.
2025 मध्ये कोकण सुंदरी आणि आता 2026 मध्ये कोकण रत्न असे पुरस्कार मिळालेत . त्याआधी मला बरेच पुरस्काराने सन्मानित केले आहे ,चॅनल वर मुलाखती ही घेतल्या गेल्यात.
कोकणरत्न अब्दुलकदीर इब्राहिम चिलवण
Teacher
- शिक्षक
- समाजसेवक
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
कोकणरत्न ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर
- कोकणरत्न 2025
- विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत विधी स्वयंसेवक
- शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024
- महाराष्ट्र सह्याद्री युवा लोकगौरव पुरस्कार 2022
नमस्कार मी ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर लॉ कॉलेज कुडाळ चा विद्यार्थी तसेच विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत विधी स्वयंसेवक सिंधुदूर्ग म्हणून कार्य करतो , तसेच महाराष्ट्र लॉ विधी असोसिएशन कुडाळ मालवण कॉलेज अध्यक्ष ,
आतापर्यंत केलेले सामजिक व शैक्षणिक कार्यातील थोडेसे योगदान :-
- कार्यतत्पर युवक म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व मालवण पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या कडून सत्कार
- मालवणचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या हस्ते सामजिक कार्यातील योगदाना बद्दल सत्कार
- बेस्ट एन. सी .सी कँँडेट म्हणून सन्मान
- ग्रामीण रुग्णालय मालवण येथे कोरोना काळात सेवा केल्याबद्दल कोविड योद्धा म्हणून सन्मान
- शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार 2024
- एच एस. सी परीक्षेत तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल माजी आमदार वैभव नाईक यांच्या तर्फे सन्मान , तसेच माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या तर्फे सन्मानपत्र
कोकणरत्न अनिल तावडे
- समाजसेवक
- पत्रकार
समाजसेवक,लेखक श्री. अनिल तावडे यांना “कोकणरत्न पदवी” गौरव सन्मान प्रदान
देवगड तालुक्यातील शिरगावचे सुपुत्र मुंबईस्थित श्री.अनिल वासुदेव तावडे यांना “स्वतंत्र कोकणराज्य अभियान”तर्फे कोकणरत्न पदवी गौरव सन्मानपूर्वक प्रदान करण्यातआला.
शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी मुंबई मराठी पत्रकार भवन,मुंबई येथे संस्थापक/अध्यक्ष श्री.संजय कोकरे आणि प्रमुख पाहुणे पत्रकार श्री.सचिन कळझुनकर यांच्या शुभहस्ते “कोकणरत्न मानद पदवी सन्मानपत्र” देऊन कोकणातील कार्याची दखल घेऊन निवडक कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला.
त्यांनी सातत्याने केलेल्या सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्षेत्रात केलेल्या अष्टपैलू कामगिरीची दखल घेण्यात आली.
कामगार विभागात विविध उपक्रम राबवून कोकणातील उन्नतीसाठी झटणाऱ्या श्री.अनिल वासुदेव तावडे यांनी कोकण विभागातही आपले योगदान दिलेले आहे.त्यांचे मालवणी मातीशी असलेले नाते लेखन, दिग्दर्शन आणि समाजसेवेतून कायम परावर्तित होत असते.
समाजात प्रचंड जनसंपर्क असल्याने विविध मान्यवर सामाजिक संस्थांकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
कोकणरत्न रुपेश कोलते
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
कोकणरत्न श्री बापू शांताराम परब
- समाजसेवक
सामाजिक कार्य व त्यातील सहभाग
- १९९७ मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ म्हाडा बांद्रा पूर्व मुंबई येथे आळंबी प्रशिक्षण व फिनेल व खडू प्रशिक्षण महिलांसाठी यामध्ये प्रशिक्षक म्हणून काम केलेले आहे बऱ्याच महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.
- 1997 पासून 2025 पर्यंत कोकणातील फणस शेतकऱ्यांकडून विकत घेऊन तो मुंबईमध्ये विक्री केला कोकणातील फणस या फळाला न्याय मिळवून दिला बचत गटांच्या माध्यमातून मुंबईमध्ये विक्री व्यवस्था करण्यात आली.
- 1997 पासून 2025 पर्यंत कोकणातील आंबा आणि जांभूळ हे कोकणातून डायरेक्ट मुंबईमध्ये मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आले शेतकऱ्यांकडून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला.
- 1997 मध्ये समता नगर महानगरपालिका येथे प्रशिक्षक असताना मुलांची लंगडी या सांघिक खेळामध्ये मुंबई महानगरपालिकेचे प्रथम क्रमांक सन्मानचिन्ह व फिरता चषक शाळेला मिळवून दिला.
- 2002 ते 2015 मध्ये कोकण महोत्सवांचे आयोजन 50 ते 70 स्टॉल धारकाला आर्थिक उत्पन्न मिळवून दिले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणातील कला जपण्याचा प्रयत्न केला.
- 2015 आकुर्ली मनपा शाळा क्रमांक 1, मध्ये विज्ञान प्रदर्शन मध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक प्राप्त केला.